श्री संत भगवानबाबा मल्टीस्टेट को.ऑप.अर्बन क्रेडिट सोसायटी लि. बद्दल

सन्माननीय ग्राहक,
सस्नेह नमस्कार !

बँकिंग व सहकारी क्षेत्रात महाराष्ट्र,राज्यासह संपुर्ण देशभरात अग्रक्रमाने आगेकूच करत असतांना श्री संत भगवानबाबा मल्टीस्टेट को.ऑप.अर्बन क्रेडिट सोसायटी लि.
माध्यमातून आम्ही आमच्या सन्माननिय ग्राहकांना वेळोवेळी बँकिंगच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे करून होणा-या गैरसोयी टाळण्यासाठी सदैव तत्पर राहण्याचा मानस सातत्यने पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.

आपल्या सेवेत बँकिंगच्या अथांग सागरात आर्थिक ठेवीचे थेंब जमा करण्यासाठी आपल्या सारख्या सुजान व जागृत ग्राहकांना आम्हाला समर्थ साथ देण्याचे आवाहन करीत आहोत. आर्थिक मदतीची प्रेमळ सावली आपल्या सारख्यांना मिळावी म्हणून आम्ही सदविवेक बुद्धीने,
संस्थेची नोंदणी 2015 रोजी झाली व स्थापना 17 ऑगस्ट 2015 रोजी शुभ मुहूर्तावर झाली 17 ऑगस्ट 2015 रोजी श्री संत भगवानबाबा मल्टीस्टेट को.ऑप.अर्बन क्रेडिट सोसायटी लि. एका छोट्याश्या वर्क्षची सुरुवात झाली.

संस्थेचे जाळे केवळ अहमदनगर जिल्हापुरतेच सिमीत न ठेवता संपुर्ण महाराष्ट्र व इतर राज्यात देखील पसरविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु केलेले आहे. श्री संत भगवानबाबा मल्टीस्टेट को.ऑप.अर्बन क्रेडिट सोसायटी लि. या संस्थेची वाटचाल यशस्वी करण्यासाठी आपली साथ मिळेल याचा आम्हाला संपूर्ण विश्वास आहे. धन्यवाद !

दूरदृष्टी

सहकार्याच्या सारातून बचतीच्या सवयींना रुजवून त्यांच्या सदस्यांची सामाजिक आणि आर्थिक स्थिती सुधारण्याची दूरदृष्टी.

मिशन

भारतासाठी प्रगतीचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी उच्च दर्जाचे मानदंड, सदस्य-केंद्रित, सेवा आधारित प्रक्रियांद्वारे सहकारी चळवळीत अग्रणी बनणे आणि प्रस्थापित करणे.

कर्मचारीवृंद

या संस्थेचा कर्मचारीवृंद फक्त साचेबद्ध व ठराविक काम करत नाही, तर त्यांच्या कामात अगत्यशील जिव्हाळा वारंवार प्रकट होतो. इथे 70 जण लोकांच्या कामासाठी तत्पर आहेत. येणारा प्रत्येक व्यक्ती आपल्यासाठी येतो आहे; त्याचा सन्मान करणे आपले कर्तव्य आहे..! हा भाव प्रत्येकाने मनात जोपासला आहे, त्यामुळे कोणताही तांत्रिक गंभीरपणा येथे जाणवत नाही. येथे काम करणा-या प्रत्येकाला ही संस्था आपली वाटते व ग्राहकांना सुद्धा ती भावना जाणवत राहते, हे या संस्थेचे दुर्मिळ गुणवैशिष्टय आहे. मा.संस्थापक व अध्यक्ष हे रूजविण्यात यशस्वी ठरले आहेत.